क्राईम
सोन्यासारख्या संसाराला अचानक कलाटणी….!
- एकाच कुटुंबातील चौघांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. ही घटना धुळ्यात प्रमोदनगर येथे घडली. त्यांनी ही पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांनी दोन दिवसांपूर्वी शेजाऱ्यांना मुंबईला येथे जातो, असे सांगितले होते. मात्र, मुंबईत न जाता घरातच चौघांनी कीटकनाशक पिऊन जीवन संपवले.
प्रवीण मानसिंग गिरासे, पत्नी दीपा प्रवीण गिरासे, मुलगा मितेश प्रवीण गिरासे व दूसरा मुलगा सोहम प्रवीण गिरासे अशी मृत सर्वांची नावे आहेत. प्रवीण यांचे धुळ्यात फर्टिलायझरचे दुकान आहे. प्रवीण हे त्यांची पत्नी व दोन मुलांसोबत प्रमोद नगर येथे राहत होते. दरम्यान, मंगळवारी त्यांनी मुलांच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे शेजारी नागरिकांना सांगितले. मात्र, मंगळवारपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. यामुळे नागरिकांना शंका आली. दरम्यान, आज प्रवीण यांची बहीण ही सकाळी त्यांच्या घरी आली.
यावेळी घरचा दरवाजा उघडाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या आत गेल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. सर्वांचे मृतदेह हे बेडवर पडले होते. हे पाहून त्यांनी टाहो फोडला. त्यांच्या आवाजाने शेजारी देखील घरात आले. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्वांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे खरे करण समजणार आहे. मात्र, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.