भारत – बांगलादेश सामन्यात राडा
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून प्रारंभ झाला आहे. पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे स्वस्तात बाद झाले. यानंतर दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यांनी डाव सावरला.
या दरम्यान पंत आणि बांगलादेशचा विकेटकीपर लिटन दास यांच्यात वाद झाला.
टीम इंडियाची टॉप ऑर्डर अपयशी ठरली. या कारणामुळे पंतला लवकर फलंदाजीला यावे लागले. जैस्वाल आणि पंत या दोघांनी ६२ धावांची भागीदारी केली.
यादरम्यान पंतचा बांगलादेशचा यष्टिरक्षक दासशी वाद झाला. फिल्डरने मारलेला थ्रो पंतला लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. फिल्डर अंगावर थ्रो मारत आहे, अशी तक्रार पंतने दासकडे केली. पण लिटन याने तो तर मारणारच, असे सांगितले. दोघांमधील या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.