महाराष्ट्र

सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना बंद करू; काँग्रेस

महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. लोकसभा निवडणूकीत फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे.

या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.अशातच आता काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी या योजनेबाबत एक खळबळजनक विधान करत काँग्रेसची अडचण केली आहे.
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की, लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने महिलांना आधार मिळाला आहे. परंतु काँग्रेसची भूमिका नेहमीच महिला विरोधीआहे. सुनील केदार म्हणाले होते की, त्यांचे सरकार आले तर ही योजना बंद करणार. पण यावरून काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बहिणींच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात आरक्षण संपवणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे काँग्रेस नेहमीच महिला विरोधी आहे हे दिसून आले. आता सुनील केदार यांच्या रूपाने काँग्रेसचा महिला धोरण विरोधी खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका म्हात्रे यांनी केली.
बँक घोटाळ्यातील आरोपी केदार यांनी सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू, असे तारे तोडले आहेत. एकूणच बहुजनांना आणि महिलांना लाभ मिळू नयेत हेच काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसच्या भुलथापांना भगिनींनी घाबरून जावू नये, असे आवाहनही म्हात्रे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button