खेळ

ब्रेकिंग! अश्विनची चेन्नई कसोटीत वन डे स्टाईल बॅटिंग

रविचंद्रन अश्विनने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करत चेन्नई कसोटीत शतक झळकावले आहे. अश्विनने बांगलादेशविरुद्ध अप्रतिम खेळी केली आहे. त्याने रवींद्र जडेजासोबत १८० हून अधिक धावांची भागीदारीही पूर्ण केली.
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमूल हसन शांतो याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडिया अडचणीत सापडली होती, पण यानंतर जडेजा आणि अश्विन यांनी डाव सांभाळला आणि संघाला ३०० चा टप्पा पार करून दिला. अश्विनचे कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे.
अश्विन टीम इंडियाकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तर जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. दमदार फलंदाजी करत अश्विनने कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले.
महत्त्वाची बाब म्हणजे हा सामना पाहण्यासाठी त्याचे वडीलही चेपॉक स्टेडियमवर पोहोचले आहेत. अश्विनने १०८ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. अश्विनच्या कारकिर्दीतील हे सहावे कसोटी शतक आणि त्याचे सर्वात वेगवान कसोटी शतक आहे.
कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने ८० षटकांत ६ विकेट गमावून ३३९ धावा केल्या होत्या. यादरम्यान जडेजा ११७ चेंडूत ८६ धावा करून नाबाद परतला. त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. जड्डूने अश्विनसोबत १९५ धावांची भागीदारी केली. जडेजा आणि अश्विनच्या या भागीदारीने अनेक विक्रम मोडीत काढले. दोघांनी २२७ चेंडूंचा सामना केला. अश्विन ११२ चेंडूत १०२ धावा करून नाबाद परतला. त्यानेही १० चौकार आणि २ षटकार मारले.

Related Articles

Back to top button