बिजनेस
ना इंटरनेट, ना कॉलिंग
अलीकडे जिओने आपल्या इंटरनेटच्या दरात वाढ केली. तसेच मोबाइल रिचार्ज प्लॅनदेखील वाढवण्यात आले. यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात आपले सीमकार्ड बीएसएनएल या सरकारी टेलकॉम कंपनीमध्ये पोर्ट करून घेतले होते. याचा जिओला चांगलाच फटका बसला होता. अशात जिओमुळे पुन्हा एकदा ग्राहक त्रस्त झाले आहेत. कारण आज जिओची सेवा अचानक ठप्प झाली.
यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. जिओची सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समाज माध्यमांवर देण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर कमेंट आणि मीम्सचा पाऊसच पडला. दरम्यान अनेकांना सेवा ठप्प झाल्याचा मोठा फटका बसला.
जिओची सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. अवघ्या तासाभरात 10 हजार पेक्षाही अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. ग्राहकांनी इंटरनेट, कॉलिंग ठप्प पडल्याचे म्हटले आहे. 67 टक्के युझर्स यांनी नो सिग्नल अशी तक्रार नोंदवली तर काही जणांनी इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचे म्हटले.