क्राईम

प्रियकरासोबत आईने ‘त्या’ अवस्थेत पाहिले

मुलगी आणि आईच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार खालापूर येथून समोर आला आहे. प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने मुलीने आईची हत्या केल्याचा भयंकर प्रकार घडला. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वावोशी विभागातील परखंदे अहिल्यानगर गावात ही घडली आहे. 
संगीता मारुती झोरे (वय 42) या दोन मुलींसह परखंदे अहिल्यानगर गावात राहत होत्या. अलीकडे पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना झोपेतून अचानक जाग आली. 
त्यावेळी संगीता हिने आपली मोठी मुलगी भारती (वय 20) ही तिचा प्रियकर संतोष दत्तात्रय नांदगावकर (वय 34 ) याच्या सोबत शरीरसंबंध करीत असताना पाहिले. 
त्यावेळी संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यावर संतोष याने संगीताचे तोंड दाबून त्यांना जमिनीवर खाली पाडले. त्याने संगीताच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरले. मुलगी भारतीने आई संगीताचे पाय धरुन ठेवले. श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला. 
संगीताचा खून केल्याचा कोणाला संशय येवू नये म्हणुन मुलगी भारती हिने आणि संतोष यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संगीताचा मृतदेह साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला लटकवला आणि त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 
मात्र संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा (वय 18) हिने घडलेला सर्व प्रकार पाहिला होता. तिने त्या रात्री घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात भारती आणि तिचा प्रियकर संतोष विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. दरम्यान पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जात आहे.

Related Articles

Back to top button