क्राईम
गणेशोत्सवाला गालबोट.!
राज्यात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच धुळ्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मिरवणुकी दरम्यान दारू प्यायलेल्या ट्रॅक्टर चालकाने तीन मुलांना चिरडले आहे. या घटनेत तीन चिमुरड्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत.
धुळ्याजवळच्या चित्तोड गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये परी शांताराम बागुल (वय-१३), शेरा बापू सोनवणे (वय-६), लड्डू पावरा (वय-३), या बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर चिमुरड्यांच्या कुटुंबियांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील चितोड गावात एकलव्य मित्र मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीच्या दरम्यान ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.