खेळ
चेन्नई कसोटीपूर्वी रोहित शर्माची सिंहगर्जना
- भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघ आमनेसामने असतील.
- याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज पत्रकार परिषद घेतली. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची रणनीती काय असेल? यासह विविध प्रश्नांवर त्याने सविस्तर उत्तरे दिली.
- रोहितने सांगितले की, बांगलादेश मालिका हा ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी आमच्यासाठी सराव नाही. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा बरेच काही पणाला लागते. वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा असतो.
- रोहित म्हणाला की, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देऊन आम्ही त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करू. यासाठी आपण फिजिओशी बोलू. तसेच दुलीप ट्रॉफीमधून अनेक उत्कृष्ट खेळाडू येत आहेत.