क्राईम

ब्रेकिंग! पुणे-सोलापूर महामार्गावर भयंकर कांड

  • इंदापूर शहरात जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावर दोन चारचाकी वाहनातून स्टंटबाजी करणे चांगलेच अंगलट आले आहे. इंदापूर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार लक्ष्मण पोपट साळवे यांनी  पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
  • याबाबत अधिक माहिती अशी कि, काल रात्री इंदापूर शहरातील जुन्या पुणे सोलापूर महामार्गावरील तुळजाभवानी मंदिराच्या समोर ह्युडाई कंपनीचे व्हेन्यु मॉडेलचे वाहन (नंबर MH42 BJ 6740) मध्ये चालक आणि 3 तरुण तसेच दुसऱ्या काळ्या रंगाची चार चाकी वाहन (नंबर नसलेले) त्यामध्ये चालक आणि दोन तरुण असे एकूण सात जण होते.
  • या सर्वानी स्वतःचा व इतरांच्या जिवीतास धोका निर्माण होईल, अश्या पध्दतीने धोकादायक परस्थितीत वाहनाचे खिडकीचे बाहेर लटकुन मोठमोठ्याने आरडा ओरडा करत स्टंटबाजी करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच वाहने भरधाव वेगात चालवुन रस्ता वाहतुकीचे नियंमाकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button