तिरुपती मंदिरातील ‘लाडू’त जनावरांची चरबी?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी मागील वायएसआर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचे म्हटले आहे. लाडू तयार करतांना शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली, असा आरोप चंद्राबाबू यांनी केला आहे. वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने हा आरोप नाकारला आहे. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण तिरुमला तिरुपती देवस्थानाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात.
चंद्राबाबू नायडू म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आयएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केले आहे. त्यांनी ‘अन्नदानम’ (मोफत अन्न) च्या गुणवत्तेशी तडजोड केली असून प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरून पवित्र तिरुमलाचे पावित्र्य भंग केले. या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे. तथापि, आमचे सरकार येथील शुद्धतेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.



