सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथे मोठी चोरी

सोलापूर (प्रतिनिधी) सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथील गाळा नंबर सी-२ येथे बागवान सेल सेल्स कार्पोरेशन या दुकानाच्या आत अज्ञात चोरट्याने प्रवेश करून दुकानातील रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर चोरून नेल्याची घटना १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी आसिफ बिलाल बागवान (वय-३०,रा. गोलचावडी हॉस्पिटल शेजारी, जोडभावी पेठ) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नदाफ हे करीत आहेत.
घराच्या गेटचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न
सोलापूर (प्रतिनिधी) घराच्या गेटचे कुलूप तोडून हॉलचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम चोरून नेल्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ ते १६ सप्टेंबर दरम्यान रंगराज नगर गोंधळे वस्ती येथे घडली.याप्रकरणी श्रीनिवास नारायण बत्तीन (वय-३९, रा. साखरपेठ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भांगे हे करीत आहेत.