महाराष्ट्र
भाजप, मनसे आक्रमक झाल्याने राहुल गांधी नरमले?

देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपने द्वेष आणि हिंसा पसरवली आहे. आपण देशात कुठेही पाहिले तर आपल्या भीती, द्वेष आणि हिंसा पाहायला मिळेल. त्यामुळे भाजपने पसरवलेल्या भिती, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात हल्लाबोल केला.
राहुल यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. आज ही यात्रात शेगावमध्ये पोहोचली असून शेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे राहुल यांनी या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर भाष्य केले नाही.
या यात्रेतून तुम्हाला काही सांगायचे आणि समजवायचे नाहीये, तर तुमच्या मागण्या समजून घेण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. तुमच्यातील भिती ओळखण्यासाठी ही यात्रा आहे. भीती, द्वेष आणि हिंसेमुळे लोक तुटतात. पण प्रेमानी बोललो त्यांचे ऐकलं तर लोक जोडली जातात. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक सातत्याने या यात्रेवरून प्रश्न उपस्थित करत आहे. पण जर ते पाच मिनिटे तरी या यात्रेत चालली असती, तर त्यांना या यात्रेचा अर्थ कळला असता, अशा शब्दांत राहुल यांनी भाजपवर टीका केली. दरम्यान भाजप आणि मनसे आक्रमक झाल्याने राहुल यांनी सावरकरांवर बोलणे टाळले, अशी चर्चा आहे.