सोलापूर
सोलापूर! दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू

- सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पुणे मंडळस्तरावर इयत्ता दहावीसाठी 9423042627 तर इयत्ता बारावीसाठी 7038752972 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
- परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशन व्यवस्था करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांना व पालकांना काही समस्या असल्यास भ्रमणध्वनी वर सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन पुणे विभागीय महामंडळ, विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी केले आहे.
- भयमुक्त-तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्ती
- माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु- मार्च 2025 या भयमुक्त व तणावमुक्त होवून परीक्षेस सामोरे जाणे आवश्यक आहे. यासंदर्भात विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पुढीलप्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल. सोलापूर जिल्ह्यासाठी समुपदेशकाचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. वृषाली आठवले (भ्रमणध्वनी क्र- 9834084593), मीनाक्षी हिरेमठ (भ्रमणध्वनी क्र – 8329230022), संगीता सपकाळ (भ्रमणध्वनी क्र. 9552982115).