महाराष्ट्र
मोठी बातमी! आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची झाली गुप्तभेट

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही. पण आज अचानक वारं बदलले. ज्या मुंडे यांच्यावर आरोप करत होते, त्यांच्याच भेटीला धस पोहोचले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
- भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मुंबईमध्ये मुंडे यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली, त्यांची भेट घेणे यात काही चुकीचे नाही, असे धस म्हणाले. ही भेट मुंबईतील एका रुग्णालयात झाली असल्याची माहिती खुद्द धस यांनीच दिली.
- मी मुंडे यांना त्यांच्या घरी माणुसकीच्या नात्याने भेटलो. कुठलीही चर्चा नाही. फक्त प्रकृतीची विचारपूस केली. साडे चार तास भेट झाली, ज्यांनी असे सांगितले त्यांनाच तुम्ही विचारा. मुंडे यांच्या विरोधातला लढा असाच सुरू राहील. संतोष देशमुख यांच्या खुन्यांना सोडणार नाही लढा असाच राहील, असे धस यांनी सांगितले.