सोलापूर

सोलापूर मनपा प्रशासनाला सद्बुद्धी देण्यासाठी घालणार साकडं

  • सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरातील विष्णू घाट येथील व लक्ष्मी मार्केट समोर असलेल्या प्रवेशद्वाराशेजारी असलेले शौचालय हटविण्यात यावे यासाठी सोलापूर शहरातील तमाम महिला मंडळाच्यावतीने ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांना महाआरती करून प्रशासनाला शौचालय हटवण्याची सद्बुद्धी द्या असे साकडे घालण्यात येणार आहे. 
  •  ही महाआरती उद्या शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथे होणार आहे. या महाआरतीत जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला मंडळ, उद्योगवर्धिनी उद्योग समूह, जैन कासार महिला मंडळ, वडार समाज महिला मंडळ, पद्मशाली सखी संगम, पतंजली योग महिला समिती, शिवसेना महिला आघाडी (ठाकरे गट), महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी, अक्कनबळग महिला मंडळ, बसव केंद्र, कलासंगम फाउंडेशन, दानेश्वरी महिला मंडळ, वीरशैव जंगम समाज महिला आघाडी, शिवदासमय महिला मंडळ, बसव योग केंद्र, मुग्धा फाउंडेशन, अक्कमहादेवी महिला मंडळ (मड्डी वस्ती), वीरशैव महिला मंडळ (सम्राट चौक), रुद्रसेना महिला मंडळ, स्वामी समर्थ महिला मंडळ, वीरशैव व्हिजन महिला आघाडी या महिला मंडळांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button