खुशखबर! रेल्वेचे स्पेशल टूर पॅकेज
पावसाळा आला की, अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडण्याचा विचार करतात. जर, तुम्हीही खूप दिवसांपासून एखाद्या धार्मिक सहलीला जाण्याचा विचार करत असाल, परंतु काही कारणांमुळे जाऊ शकत नसाल, तर आता उज्जैन आणि इंदूरच्या प्रसिद्ध मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची खास संधी चालून आली आहे.
नुकतेच आयआरसीटीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सगळ्या प्रवाशांसाठी एक खास स्वस्त आणि खिशाला परवडणारे टूर पॅकेज लॉन्च केले आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्ही देशातील प्राचीन मंदिरांना भेट देऊ शकता.
या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला महाकालेश्वर मंदिर, सांदीपनी आश्रम, चिंतामण गणेश मंदिर, हरसिद्धी मंदिर आणि उज्जैनचे मंगलनाथ मंदिर पाहण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच तुम्ही ओंकारेश्वर आणि अखिलेश्वर मंदिरांनाही भेट देऊ शकणार आहात. आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज भुवनेश्वर विमानतळावरून सुरू होईल. तिथून तुम्हाला विमानाने उज्जैन आणि नंतर इंदूरला नेले जाईल. ५ रात्री आणि ६ दिवसांचे हे टूर पॅकेज ६ सप्टेंबरपासून सुरू होईल. तुम्ही हे टूर पॅकेज घेतल्यास, तुम्हाला ५ दिवसांसाठी प्रवास, राहण्याची सुविधा आणि नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. हे टूर पॅकेज भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर ‘SCBA53’ या कोडसह उपलब्ध आहे.
जर तुम्ही या पॅकेज अंतर्गत एकाच व्यक्तीसाठी तिकीट बुक केले तर तुम्हाला ४३,२२० रुपये मोजावे लागतील. तर दोन व्यक्तींच्या पॅकेजची किंमत ३४,४४५ रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही तीन लोकांसाठी तिकीट खरेदी केले, तर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती ३३,८३० रुपये असेल. तुम्हाला हे पॅकेज बुक करायचे असल्यास तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईट www.irctc.co.in वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता. याशिवाय ८२८७९३२२२७ या क्रमांकावर संपर्क करूनही याविषयी अधिकची माहिती मिळवता येईल.