राजकीय

अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावे

महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना काही जण टार्गेट करत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. समाजकारणात मी बाळासाहेबांना मानत आलो आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे वारसदार बाळासाहेब आंबेडकर आणि कार्य करणारे अजितदादा एकत्र यावेत, अशीच माझी वैयक्तिक इच्छा आहे. हा सर्वार्थाने वरिष्ठांचा निर्णय आहे. आंबेडकरी चळवळ राष्ट्रवादीसोबत आली तर महाराष्ट्राची दिशा आणि पुढील राजकारण फार वेगळे असेल, असेदेखील मिटकरी म्हणाले.
मागील काही घटना बघितल्या तर अजितदादांना एकटे पाडण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र, महायुतीतील काही घटक पक्षांनी असे प्रयत्न करू नयेत. कोणी यावे आणि काही बोलावे हे खपवून घेतले जाणार नाहीत, असेदेखील मिटकरी म्हणाले

Related Articles

Back to top button