खेळ

ब्रेकिंग! राशीद खानची एक चूक आणि…

दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. उपांत्य फेरीत आफ्रिकेने अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकात ५६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात आफ्रिकेने केवळ एक गडी गमावून लक्ष्य गाठले.
त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर आज अफगाणिस्तान-आफ्रिका सेमी फायनल खेळली गेली. आतापर्यंत आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तान संघाने आफ्रिकेसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली आणि सहज पराभव पत्करावा लागला.
अफगाणिस्तानला मोठ्या सेमीफायनलपूर्वी सरावाची संधीही मिळाली नाही. अफगाणिस्तानने सोमवारी सेंट व्हिन्सेंटमध्ये उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली होती. यानंतर मंगळवारी सकाळी त्रिनिदादला जाणाऱ्या त्यांच्या विमानाला चार तास उशीर झाला. यामुळे त्यांना ना सरावाची संधी मिळाली ना नवीन ठिकाणाच्या वातावारणाणाशी जुळवून घेता आले.
अफगाणिस्तानने सुपर ८ मध्ये बांगलादेशला हरवून उपांत्य फेरी गाठली, तेव्हा त्यांनी तुफान जल्लोष साजरा केला. सोशल मीडियापासून सगळीकडे अफगाणिस्तानच्या सेलिब्रेशनच्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, यामुळे अफगाणिस्तान संघाचे लक्ष विचलित झाले.
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, राशीदचा हा निर्णय सर्वात मोठी चूक ठरली. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. दक्षिण आफ्रिकेने ५७ धावा काढण्यासाठी जवळपास ९ षटके खेळली यावरूनही याचा अंदाज लावता येतो.

Related Articles

Back to top button