खेळ

ब्रेकिंग! टी 20 वर्ल्ड कप जिंकताच मोठा ट्विस्ट

टीम इंडियाला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांनी मोठी मोठी घोषणा केली. रोहित आणि विराट या दोघांनीही आपण आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे. टीम इंडियाने 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर दोन्ही दिग्गजांनी हीच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, एका बाजूला टीम इंडिया जिंकला म्हणून आनंदोस्तव तर दुसऱ्या बाजूला दोन महान खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्याचे दु:खं असे चित्र काल सामन्यानंतर पाहायला मिळाले.
रोहितने फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचा निर्णय जाहीर केला. हा माझा शेवटचा सामना होता. या प्रकाराला निरोप देण्याचा यापेक्षा अधिक चांगला क्षण नाही, असे रोहितने सांगितले.
दरम्यान टीम इंडियासाठी हा माझा शेवटचा ट्वेंटी-२० सामना महत्त्वाचा होता. आम्हाला चषक मिळवायचा होता, बळजबरी करण्यापेक्षा परिस्थितीचा आदर करायचा होता. पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. काही अप्रतिम खेळाडू संघाला पुढे नेतील आणि ध्वज उंच फडकावत ठेवतील, अशा भावना विराटने व्यक्त केल्या.

Related Articles

Back to top button