रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया काल वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. T20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय खेळाडू खूपच भावूक झालेले दिसले. कारण टीम इंडियाने दहा वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली.
कर्णधार रोहित, विराट कोहली आणि हार्दिकपांड्यासह अनेक खेळाडू मैदानवरच रडले. भारताचा चॅम्पियन बनल्यानंतर रोहितने काय केले हे जाणून घेतल्यावर तुमचा त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढेल. रोहितने विजयानंतर मैदानावरची माती चाखली. वास्तविक, ICC ने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित खेळपट्टीची माती चाखताना दिसत आहे. हा क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी रोहितने हे केले. रोहितच्या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. विशेष म्हणजे बार्बाडोसच्या मैदानावर रोहितने तिरंगा गाढला.