बिजनेस

रेशन कार्डचे नवे नियम सरकारकडून जारी

देशातील केशरी, पिवळे रेशन कार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार आयुष्मान योजनेच्या लाभार्थी घटकामध्ये पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढता येणार आहे. यासाठी त्यांना त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करावे लागणार आहे.
शासनाच्या केशरी, पिवळे रेशन कार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचा लाभ यापूर्वी मिळत होता. या योजनेपासून पांढरे रेशनकार्ड धारक हे वंचित होते. मात्र, शासनाच्या आरोग्य विभागाने या निर्णयात बदल करून पांढरे रेशन कार्ड धारकांनादेखील या योजनेचा लाभ देण्याचे परिपत्रक काढले आहे.

त्यामुळे आता पांढऱ्या रेशन कार्डधारकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता व आयुष्यमान कार्ड मिळवण्यासाठी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका या आधार कार्डशी लिंक करणे महत्वाचे ठरणार आहे. आधार कार्ड व रेशन कार्ड लिंक असेल तर त्या दृष्टीने पांढरी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहीम राबवावी तसेच पांढरे रेशनकार्ड धारकांनीसुद्धा पुढाकार घेऊन त्यांचे रेशन कार्ड आधारशी लिंक करावे, असे आवाहन अन्न, नागरी व पुरवठा विभागाने केले आहे.

Related Articles

Back to top button