बजाज कंपनी लाँच करणार दमदार बाईक
जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच केल्यानंतर आता बजाज कंपनीने Pulsar N125 मॉडेल लाँच करणार आहे. कारण बजाज कामोनी आपली नवीन पल्सर आणखी वेगवान बनवण्याच्या तयारीत आहे. त्याची स्टाइलिंग मोठ्या पल्सर एन मॉडेल्सच्या अनुरूप असणार आहे.
या नवीन बजाज पल्सरमध्ये एलईडी डीआरएल, अलॉय व्हील आणि इंधन टाकीसह प्रोजेक्टर लेन्स हेडलॅम्प बसवले जाऊ शकतात.
तसेच या बाईकला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह सुसज्ज केले जाऊ शकते. कंपनी या बाईकमध्ये स्प्लिट सीट देण्याची शक्यता आहे. याशिवाय बाईकच्या मागील बाजूस एलईडी दिवे मिळणार आहेत. नवीन बजाज पल्सर 125 CC सिंगल सिलेंडर मोटरसह येऊ शकते, जी 5-स्पीड गियर बॉक्सशी जोडली जाऊ शकते.
बाईकमध्ये स्पोर्ट कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीम बसवली जाऊ शकते. बाजारात बजाज पल्सर 125 डिस्कची एक्स-शोरूम किंमत 92,883 रुपयांपासून सुरू होते. तर ही बाईक एन सीरिजमध्ये आली तर तिचे नवीन मॉडेल कोणत्या रेंजमध्ये बाजारात येईल हे पाहावे लागेल.