क्राईम
सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगनी दिली ‘इतक्या’ लाखांची सुपारी
- दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मात्र या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई या गँगचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता बॉलिवूड स्टार सलमान खान संदर्भात एक मोठी माहिती मिळाली आहे. सलमानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने तब्बल 25 लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- सिद्दीकी यांच्यानंतर सलमान हा बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. कारण सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सलमानला मारण्यासाठी बिश्नोई टोळीने तब्बल 25 लाख रुपयांची सुपारी घेतली होती.
- मिळालेल्या माहितीनुसार, सलमानच्या हत्येचा बिश्नोई गँगचा मोठा प्रयत्न होता. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानच्या घरावर देखील गोळीबार करण्यात आला होता. सलमानच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र देखील दाखल केले होते.