राजकीय

ब्रेकिंग! मनसेला महायुतीचा बिनशर्त पाठिंबा?

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा मिळाला होता. मात्र, आता विधानसभेवेळी राज ठाकरेंनी एकला चलो रे ची भूमिका जाहीर केली असून लोकसभेवेळी दिलेल्या पाठिंब्याची महायुतीकडून परतफेड बिनशर्त केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार महायुती विधानसभेतील काही निवडक जागांवर मनसेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. यासाठी शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याच गुप्त बैठकदेखील पार पडल्याचे सांगितले जात आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठाकरे, शिंदे आणि फडणवीस यांच्यात तब्बल दोन तास खलबते झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत शिवडी, वरळी, माहिमसह काही मतदारसंघांवर ही चर्चा झाल्याचे समोर येत आहे. या बैठकीबाबत अद्यात कोणत्याही नेत्याकडून भाष्य करण्यात आलेले नाही किंवा अद्याप महायुतीकडून मनसेला पाठिंबा जाहीर देणार असल्याची घोषणाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता महायुती आणि मनसेच्या पुढील निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी राज ठाकरेंनी कुणालाही पाठिंबा न देता मनसे स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी काही उमेदवारदेखील घोषित केले आहेत.

Related Articles

Back to top button