राजकीय

नाट्यमय घडामोडी सुरु, ठाकरे गटाला भगदाड!

  • विधानसभेसाठी भाजपने काल 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारी यादीकडे सर्वांच्या नजर लागल्या आहे. या सर्व घडामोडींमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्याविरोधात अजितदादांना तगडा उमेदवार सापडला असून, ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठे भगदाड पडले असून, शिरूरचे विद्यमान आमदार पवार यांच्याविरोधात अजितदादांना तगडा उमेदवार मिळाला आहे.
  • उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी शिरूर मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता होती. मात्र, आता कटकेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिरूरमध्ये पवार गटाचे विद्यमान आमदार पवार यांच्या विरोधात कटके हेच उमेदवार असू शकतात, असे बोलले जात आहे. या मतदारसंघांमध्ये चार लाख 60 हजारच्या आसपास मतदार असून, कटके हे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य असून त्यांचा वाघोली परिसरात वरचष्मा आहे. त्यात आता कटके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याचे संकेत महायुतीकडून देण्यात आल्याचे मानले जात आहे. 

Related Articles

Back to top button