राजकीय
भाजपचे ते आमदार कोणते, ज्यांची उमेदवारी धोक्यात?
- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काल आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी घोषणा केली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. काही ठिकाणी विद्यमान आमदारांची तिकिटं कापण्यात आली आहेत. तसेच काही विधानसभा मतदारसंघात नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपने आपल्या धोरणात परिवर्तन केले आहे.
- लोकसभा निवडणुकीवेळी सोलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार राम सातपुते यांना प्रणिती शिंदे यांच्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सातपुते यांच्या उमेदवारीला स्थानिक पदाधिकारी विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचे नावही पहिल्या यादीत आलेले नाही. याशिवाय पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, गेवराई लक्ष्मण पवार, खडकवासला भीमराव तापकीर, पेणचे रवीशेठ पाटील या आमदारांना कामगिरीच्या मुद्द्यावर वेटिंगवर ठेवण्यात आल्याचे समजते. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली होती. त्यामुळे भाजपाने पहिल्या यादीत या मतदारसंघातही उमेदवार दिलेला नाही.