ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

Admin
1 Min Read
  • जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये काल रात्री दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी स्थानिक आणि परराज्यातील मजुरांवर गोळीबार केला. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले आहेत. सोनेनबर्ग येथील एका बांधकामाधीन बोगद्याजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला. डॉ. शाहनवाज, फहीम नजीर, कलीम, मोहम्मद हनीफ, शशी अब्रोल, अनिल शुक्ला आणि गुरमीत सिंग अशी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सैनिकांनी सदरील परिसराची नाकेबंदी केली आहे.
  • जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी अशीच घटना घडवली होती. जिथे एका बिगर काश्मिरी तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 
Share This Article