राजकीय

बिग ब्रेकिंग! राज ठाकरेंचा पॅटर्नच वेगळा

लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर नारा दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आपला उमेदवार जाहीर केला आहे. 

राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. जाधव आणि राजू पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरताना ते स्वतः हजर राहणार आहेत. राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

राज यांनी आज ठाणे-पालघर मनसेचे जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधवला यांना ठाण्यातून मनसेची उमेदवारी जाहीर केली आहे. राज हे स्वतः २४ ऑक्टोबरला जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात येणार आहेत. याशिवाय मनसेचे कल्याण (ग्रामीण)चे विद्यमान आमदार राजू पाटील यांचीही उमेदवारी राज ठाकरेंनी जाहीर केली. 

Related Articles

Back to top button