क्राईम

पाप हे कधीच लपत नाही

  1. २०२१ साली झालेल्या एका हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.  हरियाणाच्या पानिपतमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकराबरोबर कट रचून पतीचा खून केला. विनोद बरडा असे खून झालेल्या पतीचे नाव असून त्याचा ५ ऑक्टोबर २०२१ रोजी अपघात झाला होता. या अपघातामधून विनोद बचावला होता. पण त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. हा अपघात झाल्याच्या दोन महिन्यांनी ५ डिसेंबर २०२१ रोजी त्याची पानिपतमधील घरात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, विनोद याच्या हत्येला तीन वर्षानंतर वाचा फुटली आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या फेरतपासात विनोदची पत्नी निधी आणि तिचा प्रियकर सुमितने कट रचून विनोदचा खून केल्याचे उघड झाले आहे. त्यांनी विनोदला दोन वेळा मारण्याचा कट रचला. मात्र, विनोद हा बचवला होता. मात्र, दुसऱ्या वेळेला तो वाचू शकला नाही.
    एक व्हॉट्सॲप मेसेज आणि पोलीस अधिकाऱ्याची करडी नजर यामुळे या हत्येमागील रहस्य उलगडले आहे. या हत्येमागची व्यक्ती दुसरी कोणी नसून मृत व्यावसायिकाची पत्नी होती, जिचा तिच्या जिम ट्रेनरवर जीव जडला होता. मात्र, त्यांच्या मार्गात विनोद अडथळा ठरत होता. यामुळे तिने प्रियकराच्या मदतीने हा संपूर्ण कट रचला.
    डिसेंबर २०२१ मध्ये विनोदचा खून करण्यात आल्यावर या प्रकरणी विनोदच्या काकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर ऑक्टोबरमध्ये देव सुनार नावाच्या वाहन चालकामुळे विनोदचा अपघात झाला होता, असे तपासात पुढे आले. तसेच देववर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याकडून हे प्रकरण मिटविण्यासाठी विनोदवर दबाव टाकण्यात येत असल्याची तसेच विनोदला धमक्या दिल्या जात असल्याची माहिती मिळाली. 
  2. दरम्यान, १५ डिसेंबर २०२१ रोजी देवने विनोदच्या पानिपत येथील घरी जात घराचे दरवाजे आतून बंद करत विनोदवर गोळीबार करत त्याची हत्या केली. देव हा ट्रक चालक होता. याआधीही त्यांनी विनोद यांना ट्रकने मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यात विनोद गंभीर जखमी झाला होता. अटकेवेळी देव याने पोलिसांना सांगितले होते की, ट्रक अपघात प्रकरणात कोर्टाबाहेर तोडगा काढण्यास नकार दिल्याने आपण विनोदचा खून केला. देव हा तुरुंगात होता व हा खटला रखडला होता. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
    पोलिस याचा तपास करत असतांना जिल्हा पोलीस प्रमुख व आयपीएस अधिकारी अजितसिंह शेखावत यांच्या फोनवर व्हॉट्सॲप मेसेज आला. मेसेजमध्ये विनोदच्या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या प्रमोद या भावाने या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलीस अधिकाऱ्याला या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची विनंती करण्यात आली होती. विनोद यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने त्याच्या हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर या गुन्हाचा पुन्हा फेरतपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी या प्रकरणात काही तरी काळेबेरे असल्याचे लक्षात आले. पुन्हा या प्रकरणाचा तपास करतांना पोलिसांना आढळले की, अपघात प्रकरणी गुन्हात होणारी शिक्षा ही कमी असते. हा गुन्हा मागे घेण्यासाठी कुणी कुणाचा खून का करेल?
    यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने हरियाणा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण संस्थेचे दीपककुमार यांना या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यास सांगितले. पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. तेव्हा देव हा जिम ट्रेनर सुमितच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यांचे फोन कॉल ट्रेस करण्यात आले. हा जिम ट्रेनर विनोद याची पत्नी निधीला चांगला ओळखत होता. पोलिसांनी संशयितांवर नजर ठेवून चौकशी केली. हळूहळू या मर्डर मिस्ट्रीचे कोडे सुटू लागले.
    विनोदची पत्नी निधी हिचे आणि सुमितचे प्रेम प्रकरण सुरू होते. निधी ही सुमितला जिममध्ये भेटली. येथे दोघांमध्ये जवळीक वाढली व त्यांचे अफेअर सुरू झाले. विनोदला या प्रकरणाची कुणकुण लागली. यावरुन त्याचे पत्नी निधीशी भांडण झाले. तसेच त्यांच्यात वाद वाढू लागले होते. विनोदने सुमितशीही भांडण केले व त्याला पत्नीपासून दूर राहण्यास सांगितले. या भांडणांनंतर निधी व सुमितने विनोदच्या हत्येचा कट रचला.
    चौकशीदरम्यान सुमितने पोलिसांना सांगितले की, या कामासाठी त्याने पंजाबमधील ट्रकचालक देव याच्याशी संपर्क साधला होता. ट्रक चालकाला १० लाख रुपये रोख देऊ करण्यात आले. त्याने मान्य केले. त्यानंतर पिकअप व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आणि ५ जानेवारी २०२१ रोजी देव यांनी या वाहनाने विनोदच्या कारला धडक दिली. यात विनोद गंभीर जखमी झाला, मात्र बचावला. यानंतर निधी आणि सुमितने बी प्लॅन तयार केला.
    देवने विनोदच्या घरी जाऊन अपघात प्रकरण निकाली काढण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिला. यामुळे देवने विनोदवर गोळी झाडून त्याची हत्या केली. विनोदच्या हत्येनंतर काही दिवसांनी सुमित आणि निधी मनालीला गेल्याचेही तपासात समोर आले आहे. बातम्यांनुसार, तिने आपल्या मुलांना ऑस्ट्रेलियात त्यांच्या काकांकडे राहण्यासाठी पाठवले. या प्रकरणातील दुवे जोडून पोलिसांनी निधी आणि सुमितला ताब्यात घेऊन चौकशी केली. दोघांनीही गुन्हा कबूल केला. ते आता तुरुंगात आहेत.

Related Articles

Back to top button