राजकीय
ब्रेकिंग! ठाकरे गट-काँग्रेस वाद मिटला, उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपने काल आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याशिवाय महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गट आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आज त्यांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
- उद्या संध्याकाळी मविआचे तिन्ही नेते जागावाटप जाहीर करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. उद्या काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे पटोलेंनी सांगितले. तसेच मेरिटच्या आधारावर उमेदवार देण्याबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील वाद विकोपाला चालला आहे. विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात टोकाचे वाद झाले आहेत. मात्र आज माध्यमांशी बोलताना आमच्यात विदर्भाच्या जागेवरून काहीच वाद नाही, असे पटोलेंनी सांगितले.