उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावे
राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर खुद्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. प्रथम सत्ताधारी महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला चेहरा जाहीर करेल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदाबाबर मोठे विधान केले.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायला हवी होती. माझे वैयक्तिक मत आहे की, पुढच्या काळात त्यांनीच त्या पदावर विराजमान व्हावे, असे ठाकूर म्हणाल्या.
प्रत्येक कार्यकर्त्याने आपले गाव आणि बूथ सक्षमपणे सांभाळावे. विजय आपलाच असला तरी ही लढाई मोठी असल्याने कोणीही गाफील राहू नये. आता देशाने दुष्ट शक्तींच्या विरोधात पुन्हा पेटून उठण्याची वेळ आली, असे त्या म्हणाल्या.