सोलापूर

आता भाजपला त्रास देण्याची वेळ आली

अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत. दरम्यान नूतन खासदार प्रणिती शिंदे सध्या त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. 

भाजपामुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी आणि त्यांच्या कारखान्याच्या शेतकरी, सभासदांना त्रास सहन करावा लागला. मात्र आता काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे, त्यामुळे आता त्रास सहन करायची नाही, तर त्रास देण्याची वेळ आली, असे विधान प्रणिती यांनी केले आहे. सिद्धेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि कारखान्याच्या सभासद, शेतकऱ्यांना भाजपाच्या लोकांमुळे त्रास सहन करावा लागला आहे. 
हे सांगताना सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याचे प्रणिती यांना आधोरेखित करायचे होते. आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे. आता त्रास सहन करायची नाही, तर त्रास देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांत तुम्हाला जो त्रास झाला आहे, तो पुसून काढायचा आहे, असे सांगून खासदार प्रणिती यांनी भाजपावर टीका केली आहे.

Related Articles

Back to top button