मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा लग्न करणार?

Admin
1 Min Read

एकदिवसीय वर्ल्ड कप २०२३ मध्ये आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या मोहम्मद शमीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात मोठी अफवा म्हणजे तो आणि सानिया मिर्झा लग्न करणार आहेत.
शमी हा टीम इंडियाच्या महत्वाच्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे तर सानिया ही भारतीय टेनिसमधील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. दोन्ही खेळाडू आपापल्या खेळात तज्ञ आहेत आणि त्यांचा आदर केला जातो. दरम्यान, या दोन्ही स्टार खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. शमीचे त्याची पत्नी हसीन जहाँसोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. तर सानियाने अलीकडेच पाकिस्तानी क्रिकेटर पती शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला सानिया आणि शोएब यांचा घटस्फोट झाला. तर शमीनेही पत्नी हसीन जहाँपासून विभक्त झाला आहे.
मात्र, शमी आणि सानियाच्या लग्नाच्या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. सानियाचे वडील इम्रान एका मुलाखतीत म्हणाले की, हे सर्व बकवास आहे. ती त्याला कधी भेटलीही नाही.

Share This Article