महाराष्ट्र

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अलीकडे लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर नवीन सरकार सत्तेवर आले. दोन महिन्यांपेक्षा दीर्घ काळ लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु होती. एकूण सात टप्प्यात ही निवडणूक होती. आता लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोग पुन्हा कामाला लागले आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली. आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. घरोघरी जाऊन मतदार याद्या अदयावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मतदान केंद्राच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत.
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी राज्यातील सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निकाल जाहीर झाले होते.
यंदा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते. महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्याआधीच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

Related Articles

Back to top button