बिजनेस

5G नेटवर्कमध्ये Jio फास्ट की Airtel?

5G नेटवर्कमध्ये Jio फास्ट की Airtel याचे उत्तर आले आहे. जिओने पुन्हा एका मैलाचा दगड पार केला आहे. जिओने तीन प्रमुख क्षेत्रांवर वर्चस्व राखले आहे. 

नेटवर्क गती, कव्हरेज आणि सेवांमध्ये सातत्य यामध्ये जिओ अव्वल ठरले आहे. भारताच्या दूरसंचार उद्योगात जिओने अन्य कंपन्यांना मागे टाकले आहे. भारतात ५ जी मोबाईल नेटवर्ट रोलआउट करण्यात जिओ आणि एअरटेल सर्वात पुढे आहेत. दोन्ही कंपन्यांचा दावा आहे की, त्यांचे नेटवर्क सर्वात गतिमान आणि विस्तारीत आहे. ताज्या रिपोर्टमध्ये यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ओपन सिग्नलच्या लेटेस्‍ट रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये या कंपन्यांची तुलना केली गेली. 

यामध्ये काही बाबींमध्ये जिओ पुढे आहे तर काहींमध्ये एअरटेलने बाजी मारली आहे. ओवरऑल डाउनलोड स्‍पीड एक्‍सपीरियन्समध्ये जिओ नंबर वन ठरली आहे. तर ओवरऑल अपलोड स्‍पीड एक्‍सपीरियन्समध्ये एअरटेल विजयी ठरले आहे.

Related Articles

Back to top button