महाराष्ट्र

बिग ब्रेकिंग! मुख्यमंत्री शिंदे थोडक्यात बचावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर दुर्घटना होण्यापासून बचावले आहेत. शिंदे हे आपले मुळगाव साताऱ्यातील दरे येथून हेलिकॉप्टरने पुण्याकडे येते होते. पण हेलिकॉप्टरने टेकऑफ घेतल्यानंतर कोयना धरणाच्या बॅकवॉटरवरून हे हेलिकॉप्टर जात होते. त्यावेळी हेलिकॉप्टर अचानक खाली आली. कोयना बॉकवॉटरच्या अगदी पंधरा फूटवर हेलिकॉप्टर खाली आले होते. त्यानंतर पायलटने प्रयत्न करून दरे गावात हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरविले.

आज सायंकाळच्यावेळी शिंदे हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने येत होते. त्यांच्याबरोबर स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी राजेंद्र कवळे हेही होते. हेलिकॉप्टर मार्गस्थ झाले होते. परंतु अचानक ढगाळ वातावरण झाले अन् मुसळधार पाऊस सुरु झाला. कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फूटवर हेलिकॉप्टर खाली आले होते. आजूबाजूच्या कोणत्याही एका शेतामध्ये हेलिकॉप्टर लँड करावे का? याबाबत पायलट आमच्याजवळ विचारणा करत होते. परंतु त्या सोयीची कोणतीही जमीन आजूबाजूला नसल्याने हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले. 

जेथून टेकऑफ घेतला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले. त्यानंतर मुख्यमंत्री मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना अधिक प्रमाणात असताना महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण सुखरुप आहोत. या संपूर्ण प्रसंगादरम्यान वाचताना केलेल्या पुण्यकर्माची आठवण झाली आहे, असे मंगेश चिवटे यांनी आपल्या सोशल मीडियावर दिलेल्या माहितीवर म्हटले आहे.

 

Related Articles

Back to top button