हवामान
ब्रेकिंग! हवामान विभागाचा नवा अंदाज
गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने कोकण आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्हे व्यापले आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भातदेखील धडक दिली आहे.
- हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान या काळात केवळ जोरदार पाऊसच पडणार नसून वादळाचा इशारादेखील देण्यात आला आहे. राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी राहू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.