राजकीय

महायुतीची महाकोंडी

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता मनसेने मोठा निर्णय घेत आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

राज्यात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार, मनसेदेखील विधानसभा निवडणूक लढवणार आहे. यासंर्भात 13 जून रोजी मनसेची महत्वाची बैठक पार पडणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मनसेकडून महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील 20 जागांची मागणी करण्यात येणार आहे. यासाठीच उद्या महत्वाची बैठक होणार आहे. यंदा मनसे महायुतीकडे दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे यासारख्या जागांची मागणी करू शकते.

Related Articles

Back to top button