बिजनेस

रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

केंद्रात सत्ता स्थापित होताच मोदी सरकारने शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने नुकत्याच आधारकार्ड रेशन कार्डशी लिंक करण्याच्या तारखेमध्ये वाढ केली आहे. यामुळे रेशन कार्डधारकांना 30 जूनऐवजी 30 सप्टेंबरपर्यंत आधार आणि रेशन कार्ड लिंक करता येणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबतची माहिती अधिसूचना दिली आहे.

केंद्रामध्ये सत्ता स्थापित झाल्यानंतर मोदी सरकार जनतेसाठी विविध योजना आणताना दिसत आहे.
आता मोदी सरकारने गोरगरिबांना दिलासा देत आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याच्या अंतिम तारीख 30 जून होती. परंतु आता 30 सप्टेंबरपर्यंत या तारखेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाचे म्हणजे मोदी सरकारने ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ची घोषणा केल्यापासून रेशनकार्ड आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. कारण, मधल्या काळामध्ये विविध भागातील लोक एकापेक्षा जास्त रेशन कार्ड घेऊन योजनेचा अधिक फायदा घेत असलेले निदर्शनात आले होते. यावर ठोस कारवाई व्हावी, म्हणून सरकारने हा नियम लागू केला. या नियमामुळे कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा अधिक रेशन कार्डवरून मोफत धान्य घेता येणार नाही.

Related Articles

Back to top button