ब्रेकिंग! राज्यात उष्णतेची लाट

Admin
1 Min Read
उन्हाळा असह्य झाला आहे. त्यातच सोलापुरसह राज्यात उष्णतेची लाट आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आण विदर्भाचा पारा यापूर्वीच वाढला आहे. त्यामुळे यापासून स्वत:चा आणि कुटुंबाचा कसा बचाव करावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान सोलापुरात आज 41.7  अंश तापमानाची नोंद झाली आहे. तहान लागलेली नसली तरी प्रत्येकाने दर अर्धा तासाने पाणी प्यावे. दुपारी १२ ते 4 दरम्यान घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडण्याची गरज असेल तर डोक्यावर टोपी वापरावी किंवा छत्रीचा वापर करावा. कडक सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी पडदे आणि झडपांचा वापर करावा.
सुती, हलके आणि पातळ कपडे वापरावेत. प्रवास करत असाल तर सोबत पाण्याची बाटली बाळगा. उन्हात काम करत असाल तर डोक्यात टोपी घाला, ओल्या कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाकावा.
Share This Article