सोलापूर
लोक म्हणाले पप्पू; पण फडणवीस म्हणाले, राहुल गांधी
लोक म्हणाले पप्पू; पण फडणवीस म्हणाले, राहुल गांधी… पप्पू हे त्यांचं घरातलं नाव!!… हा किस्सा आज सोलापुरात घडला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर होते. भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर मतदारसंघातले उमेदवार आमदार राम सातपुते यांचे अर्ज दाखल करण्यासाठी फडणवीस सोलापुरात आले होते. निंबाळकर आणि सातपुते या दोन्ही उमेदवारांनी भव्य रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केले. आमच्या गाडीला डबे आहेत. त्या डब्यांमध्ये सर्वसामान्य लोकांना बसायला जागा आहे. या गाडीत दिन दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, सर्व समाज घटक येऊन बसू शकतात, पण राहुल गांधींच्या गाडीत फक्त इंजिने आहेत. त्या इंजिनांमध्ये त्यांचेच परिवार येऊन बसले आहेत. सर्वसामान्य लोकांना त्यांच्या इंजिनात बसायला जागाच नाही. त्यामुळे लोकांनी ठरवायचे कोणाला निवडून द्यायचे?? कमळाचे बटन दाबले तर कोणाला मत जाईल??, असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला. त्यावर उपस्थित असलेले लोक म्हणाले, मोदींना. आणि हाताच्या पंजाचे बटन दाबले किंवा तुतारीचे बटन दाबले, तर कोणाला मत जाईल??, असे विचारल्यावर लोक म्हणाले, पप्पूला…!!… तेव्हा लगेच फडणवीस म्हणाले, “पप्पू” नाही, राहुल गांधी!!… “पप्पू” हे त्यांचे खास घरातले नाव आहे. त्यामुळे आपण त्यांना “पप्पू” म्हणायचे नाही. ते राहुल गांधी आहेत, असा टोमणा फडणवीसांनी हाणला. त्यावर सभेत प्रचंड हशा पिकला. त्यानंतर फडणवीस यांनी इतर विषय काढून सभा गाजवली.