राजकीय

राज्यात कल काय?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीमध्ये काट्याची टक्कर होत आहे. महाराष्ट्रात काय निकाल लागणार याची अनेकांना उत्सुकता लागली असून या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध झालेल्या अंतिम ओपिनियन पोलनुसार गेल्या दोन महिन्यात राज्यात हवा पालटल्याचे दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडीला केवळ १८ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे दिसत असून महायुती ३० जागांवर विजयी होणार असल्याचे सर्वेमधून दिसत आहे.
पोलमध्ये अनेक जागांवर धक्कादायक निकाल लागणार असल्याचे समोर आले आहेत. कोल्हापूर, बारामती, परभणी, माढा, हातकणंगले आणि मुंबईतील जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये अनपेक्षित निकाल लागू शकतात. एबीपी -सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील सर्व म्हणजे ४८ मतदारसंघात सर्वेक्षण केले गेले. त्यातील आकडेवारीनुसार कोणता उमेदवार आघाडीवर आणि पिछाडीवर राहणार, याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

Related Articles

Back to top button