राजकीय
भाजपच्या सर्व्हेचा फटका
देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, राज्यात शिंदे गटाचा जागांसाठीचा संघर्ष थांबलेला नाही.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या सहा जागांना भाजपाच्या सर्व्हेचे ग्रहण लागले आहे. शिवसेनेच्या सहा जागांसाठी शिंदे गटाचा संघर्ष सुरु असून भाजपाच्या सर्व्हेमुळे या जागांचा तिढा सुटलेला नाही.
दक्षिण मुंबईत ठाकरे गटाने अरविंद सावंतांना उमेदवारी दिली आहे. मात्र महायुतीला अरविंद सावंतांविरोधात अजूनही सक्षम उमेदवार मिळालेला नाही. ठाण्यात राजन विचारेंविरोधात शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. तर पालघरमध्ये ठाकरेंनी भारती कामडींना उमेदवारी दिली आहे. मात्र पालघरमध्ये भाजपा आपला उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात ठाकरेंकडून विनायक राऊतांनी उमेदवारी दाखल केली आहे. मात्र महायुतीत सावंत विरुद्ध राणे कुटुंबात संघर्ष पेटला आहे. नाशिकमध्ये ठाकरेंकडून राजाभाऊ वाजे मैदानात आहेत. पण अजितदादा पवार गटाकडून छगन भुजबळांचे नाव पुढे आल्यामुळे हेमंत गोडसेंची अडचण वाढली आहे.

संभाजीनगरच्या जागेची संधी चंद्रकांत खैरेंना मिळाली. खैरें विरोधात महायुतीच्या उमेदवाराचा शोध सुरुच आहे. भाजपाच्या सर्व्हेनुसार या सहा जागांवर शिंदे गटाचे उमेदवार निवडून येणार नाहीत, असा असा अंदाज आहे. दरम्यान सर्वेच्या आडून भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचा विश्वासघात केल्याची टीका भास्कर जाधवांनी केली आहे.