ब्रेकिंग! समोसा अन् जिलेबीचा समावेश हानिकारक पदार्थांच्या यादीत होणार?

Admin
2 Min Read
  • फास्ट फूड हे आरोग्यास घातक आहे. हे वेळोवेळी तज्ज्ञांकडून सांगितले जाते. पण त्यावर नियंत्रण ठेवणे अनेकदा आपल्याला जमत नाही. मात्र आता आपण नेहमी खात असलेल्या एका फास्टफुडसह जिलेबी देखील आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या यादीमध्ये आहे. त्यावर आता थेट आरोग्य मंत्रालयाकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
  • समोसा, जिलेबी आणि चाय-बिस्कीट म्हटले की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. पण या पदार्थांमुळे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे आता तुम्ही या पदार्थांचे सेवन करणार का? त्यामुळे आता नागपूरमध्ये समोसा आणि जिलेबीच्या दुकानाबाहेर धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावण्यात आला आहे. जेणे करून लोकांना कळेल की, ते खात असलेल्या पदार्थांमध्ये किती प्रमाणात साखर आहे.
  • आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या सारख्या नाश्त्यामुळे तुमचे शरीर अनेक आजारांचे शिकार होत आहे. त्यासाठी ज्याप्रमाणे तंबाखू आणि सिगारेटच्या पाकिटांवर धोक्याचा इशारा दिला जातो. त्याचप्रामाणे आता समोसा आणि जिलेबीबाबत देखील केले जाणार आहे. त्याच नियमाचे पालन करत नागपूरमध्ये समोसा आणि जिलेबीच्या दुकानाबाहेर धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावण्यात आला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, सावधानता बाळगून खा, तुमचे भविष्य तुमचे आभार मानेल.
  • याबाबत आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूरसह सर्व केंद्रिय संस्थांना आदेश दिले आहेत. असे पोस्टर त्या संस्थांमध्ये लावण्यात यावेत. जेणे करून लोकांना स्पष्ट कळेल की, त्यांच्या दररोजच्या नाश्त्यामध्ये किती प्रमाणात फॅट आणि साखर आहे. जी आपल्या शरीराला हानिकारक आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाकडून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Share This Article