आरोग्य

ब्रेकिंग! पुण्यात नव्या व्हायरसची एन्ट्री! 22 संशयित

  • पुण्यात एका नवीन व्हायरसचा शिरकाव झाला आहे. एचएमपीव्ही व्हायरसच्या धक्क्यातून सावरत असतानाच या विषाणूने नव्या संकाटाची चाहूल दिली आहे. तसेच या विषाणूने पेरू देशात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे येथे हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. आता याच विषाणूचे 22 संशयित रुग्ण पुण्यात आढळले आहेत. या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झाली असावी, असा अंदाज आहे. या रुग्णांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच यावर भाष्य करता येईल. परंतु, या निमित्ताने एका नव्या व्हायरसचे नाव कानी आले आहे.
  • जागितक आरोग्य संघटनेनुसार गुईलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच मज्जातंतूवर हल्ला करू लागते. यामुळे स्नायू्ंमध्ये कमकुवतपणा येतो. स्नायू सुन्न पडतात, त्यात वेदनाही होतात. या आजारात कधीकधी अर्धांगवायूचा झटका येण्याचीही शक्यता असते. या आजाराचा फैलाव वेगाने होत असला तरी रुग्ण लवकर बरे देखील होतात. परंतु, रुग्णांना बरे होण्यासाठी लागणारा वेळ मात्र वेगवेगळा असू शकतो.
  • आजाराची लक्षणे काय, कशी ओळखाल-
  • गुईलेन बॅरे सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार. यात स्नायू कमकुवत होतात. स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात, संवेदना कमी होतात. चेहरा, डोळे, छाती शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो. तात्पुरता अर्धांगवायू तसेच श्वसनासही त्रास होतो.
  • हाताची बोटं, पायात वेदना होतात. चालताना त्रास, चिडचिडही होते. आजार कुणालाही होऊ शकतो. शक्यतो 12 ते 30 वयोगटातील लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. 

Related Articles

Back to top button