ब्रेकिंग! वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापले आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तर इतर सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिकवर २० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणातील नवीन सीसीटीव्ही समोर आला आहे. या सीसीटीव्हीत खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत.
अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवसाचा हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांसह सर्व आरोपी एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही पोलीस अधिकारीही त्यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. या आरोपींनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती. त्याच संबंधिताचा हा व्हिडीओ समोर येत आहे. या व्हिडीओ पीएसआय पाटीलही दिसत आहेत.