राजकीय

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना दणका, 35 नेत्यांचा राजीनामा

  • राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षांतरे केली. अनेकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला. मात्र असेही काही नेते होते ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर पक्षांतर केलेल्या या नेतेमंडळींत अस्वस्थता वाढू लागली आहे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांना गळती लागली आहे. याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे. एकामागोमाग एक मोठे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडत आहेत.
  • छत्रपती संभाजीनगरचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत नुकताच राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
  • पक्षात आता मान, सन्मान मिळत नाही, असा आरोप करत स्वामी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. स्वामी यांच्याबरोबर उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी अशा पदाधिकाऱ्यांनी आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष संघटना बांधण्याचे मोठे आव्हान ठाकरेंसमोर आहे. यासाठी पक्षाने हालचालीही सुरू केल्या आहेत. परंतु, दुसरीकडे गळती लागल्याने त्यांच्यासमोरील अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Related Articles

Back to top button