आरोग्य
मार्च नाही तर फेब्रुवारीतच बसणार उन्हाच्या झळा

- गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात विविध बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री गारवा तर दिवसा उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रात्री जाणवणारा गारवाही कमी झालेला आहे.
- परंतु, आता हा गारवा पूर्णतः कमी होणार असून फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके लागणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
- फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतभर उन्हाच्या झळा जाणवणार असून किमान व कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना यंदाच्यावर्षी महिन्याभर आधीपासूनच गरमी सहन करावी लागणार आहे.
- भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार, देशभरात फेब्रुवारी महिन्यापासून किमान आणि कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे. मुंबई, किनारपट्टी व उत्तर व मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार आहे.