मोदी सरकार 3.0 चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प गरीब, तरूण, शेतकरी आणि महिलांवर केंद्रित आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. यावेळी सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. किसान क्रेडिट कार्ड मर्यादा मोदी सरकारने वाढवली आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
मोदी सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांपर्यंत होती. आता ती पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याने शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध होणार आहे.