राजकीय

ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारावेळी खळबळ

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान
धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना चक्कर आल्याची घटना समोर आली आहे. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार रॅली दरम्यान त्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. दरम्यान घटनास्थळी असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांनी पाटील यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका आणि रॅलींचा धडाका सुरू झाला आहे. अशामध्ये आज धाराशिव मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सहभागी झालेले आमदार पाटील यांना उष्माघाताचा त्रास होऊन ते चक्कर येऊ खाली पडले. परिणामी मोठा गोंधळ उडाला. राज्यातील तापमान वाढत आहे. कडक ऊन आणि अति उष्णता यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होताना दिसत आहे. 

Related Articles

Back to top button